विविध ठिकाणची कृष्णमूर्ती शिक्षण केंद्रं स्थानिक जनतेशी सातत्याने संवाद साधून सामाजिक दृष्ट्या लाभदायी अशा उपक्रमांना चालना देतात.
कोलकाता आणि मुंबई ह्या शहरांमधल्या लहान केंद्रांतर्फे कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांच्या ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येतात आणि संवाद-सत्रं आयोजित करण्यात येतात. शिक्षणक्षेत्रात काम करणार्या व्यक्तींसाठी कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित परिसंवादांचं आयोजन करण्यात येतं; शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कृष्णमूर्तींच्या साहित्याचं वाचन आणि चर्चा आयोजित करण्यात येतात. स्थानिक पुस्तक प्रदर्शनातही केंद्रांचा सहभाग असतो.