दृष्टिबाधित वाचकांसाठी ब्रेलमधील आणि ध्वनिमुद्रित पुस्तकं

NAB (नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लाइंड), मुंबई ह्या संस्थेच्या सहयोगाने दृष्टिबाधित वाचकांसाठी फाउंडेशनच्या काही प्रकाशनांच्या ब्रेल आणि ध्वनिमुद्रित आवृत्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. भारतातील अनेक तत्सम संस्थांना नॅबतर्फे ह्या पुस्तकांचं वितरण करण्यात आलं आहे. ह्या माध्यमांमधून अधिकाधिक पुस्तकांचं प्रकाशन करण्याचा उद्देश आहे.

ही ब्रेल पुस्तकं आपण kfimumbai@gmail.com ला इमेल पाठवून मागवू शकता. ब्रेल प्रेसच्या उपलब्धतेनुसार ह्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. ह्या ब्रेल पुस्तकांची किंमत साधारणपणे रु. ७५/- ते २००/- च्या दरम्यान पृष्ठसंख्येवर अवलंबित असते. ह्या पुस्तकांची जाडी काहीशी जास्त असल्यामुळे ती पाठवण्यासाठी लागणारा भाडेखर्च प्रत्येक ऑर्डरसाठी कळविला जाईल.

नॅबची ही ध्वनिमुद्रित पुस्तकं फक्त दृष्टिबाधित अभ्यासकांसाठी विशिष्ट विनंतीनुसार नॅबद्वारे पुरविली जातात. के. एफ. आय. च्या मुंबई केंद्राशीही आपण ह्यासाठी संपर्क करू शकता. 
ब्रेल आणि ध्वनिमुद्रित माध्यमामधून उपलब्ध असलेली पुस्तकं:
इंग्रजी शीर्षक गुजराथी शीर्षक मराठी शीर्षक हिंदी शीर्षक नॅबद्वारा प्रकाशित ध्वनिमुद्रित आवृत्या
Education and Significance of Life શિક્ષણ અને જીવન રહસ્ય शिक्षण जीवन रहस्य  शिक्षा एवं जीवन का तात्पर्य मराठी, गुजराथी, हिंदी
Freedom from the Known જ્ઞાત વિસર્જન ज्ञातापासून मुक्ती ज्ञात से मुक्ति मराठी, गुजराथी, हिंदी
The Book of Life (booklet)   जीवन पुस्तक (पुस्तिका)    
K for the Young - What does Fear Do to You?        
K for the Young - What does Freedom mean?        
K for the Young - What is it to Care?        
The Only Revolution   एकमेव परिवर्तन    मराठी 
The Urgency of Change ત્યારે જિવવું શિ રિતે      गुजराथी 
The Life and Death of Krishnamurti   जीवन आणि मृत्यू    मराठी