'मुक्ती ही प्रतिक्रिया नाही आणि पर्यायही नाही. आपल्यापुढे पर्याय आहेत म्हणून आपण मुक्त आहोत असं मानणं हा माणसाचा निव्वळ बहाणा आहे. मुक्ती म्हणजे निखळ निरीक्षण; स्वछंदपणे केलेलं, त्यात ना शिक्षेची भीती ना बक्षिसाचं अमिष. मुक्ती म्हणजे निर्हेतुक असणं. मुक्ती म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीची परिसीमा नाही; मुक्ती म्हणजे मानवी अस्तित्वाचा पहिला पदक्षेप आहे... मुक्ती म्हणजे निरंतर आपल्या अस्तित्वाचं, कार्याचंच निव्वळ भान असणं.'

- जे. कृष्णमूर्ती