जे. कृष्णमूर्ती – संपूर्ण शिकवण: संकेतस्थळ

जे. कृष्णमूर्ती ऑनलाइन हे संकेतस्थळ  अमेरिका, इंग्लंड, भारत आणि लॅटिन अमेरिका येथील कृष्णमूर्ती फाउंडेशन्सनी एकत्र येऊन केलेला आगळा प्रकल्प आहे. कृष्णमूर्तींची अधिकृत शिकवण लोकांना सहजपणे उपलब्ध करून देणं हे ह्या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे.

१९३३ ते १९८६ ह्या कालावधीमधील कृष्णमूर्तींचं प्रकाशित साहित्य आणि त्यांच्या बहुसंख्य भाषणांची ध्वनिमुद्रणं आणि ध्वनिचित्रफिती ह्यांच्या लिखित प्रती अधिकृत स्वरुपात इथे उपलब्ध होतील.

ह्या नव्या संकेतस्थळाचं स्वरूप आणि विषयव्याप्ती लक्षात घेऊन त्यावर सातत्याने काम करण्यात येत आहे. कृष्णमूर्तींच्या जीवनकाळातील सुमारे ५०% साहित्य अप्रकाशित आहे आणि ह्या स्थळावर त्याचा अंतर्भाव करत राहण्याची गरज आहे.