ध्वनीमुद्रित पुस्तकं

इंटरनेटच्या आधुनिक युगात बर्‍याच वाचकांचा कल मोबाईल वा वैयक्तिक संगणकाचा वापर करून दृकश्राव्य माध्यमांमधून वाचन, श्रवण करण्याकडे झुकतो आहे. हे ध्यान्यात घेऊन आता कृष्णमूर्तींच्या अनुवादित पुस्तकांच्या ध्वनिमुद्रित आवृत्या (ऑडिओ बुक्स) मोबाईल ॲपद्वारे प्रकाशित करण्यात येत आहेत. कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडियाच्या मुंबई केंद्राने स्टोरीटेल इंडिया च्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात ’ज्ञातापासून मुक्ती’ (Freedom From the Known) आणि ’या गोष्टींचा विचार करा’ (Think On These Things) या दोन मराठी पुस्तकांच्या ध्वनिमुद्रित आवृत्या मोबाईल ॲपद्वारे प्रकाशित झाल्या आहेत. पुढच्या टप्प्यात हिंदीमधून आणि त्यानंतर इतर प्रादेशिक भाषंमधून अशी ऑडिओ पुस्तके उपलब्ध केली जातील. आजच्या संघर्षमय - गोंधळलेल्या परिस्थितीत जीवनाचा अर्थ शोधणार्‍या तरूण पिढीच्या मनाला भिडणारे असे हे जीवनभाष्य आता आधुनिक माध्यमामधून मराठी श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे.

ही मराठी ऑडिओ पुस्तके स्टोरीटेलच्या संकेतस्थळावर https://www.storytel.com/in/en/ उपलब्ध असून, तिथे या पुस्तकांच्या ध्वनिमुद्रणाचे नमुने ऐकण्याची सोय देखील आहे.