जे. कृष्णमूर्ती – अधिकृत यु ट्युब वाहिनी

ह्या वाहिनीचं व्यचस्थापन इंग्लंड आणि अमेरिका स्थित कृष्णमूर्ती फाउंडेशन्स तर्फे केलं जातं.

फाउंडेशन्सच्या कार्याविषयी बोलताना कृष्णमूर्ती म्हणाले होते, 'शिकवण समग्रपणे, अबाधितपणे आणि विकृत न होता जतन करण्याची फाउंडेशन्सची जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यक्रमांमधून कोणत्याही विशिष्ट संप्रदायाची भलावण केली जाणार नाही... तसंच कोणत्याही प्रकारे शिकवण किंवा व्यक्ती ह्यांना ’देव्हार्‍यात’ ठेवलं जाणार नाही.

कृष्णमूर्ती फाउंडेशन्स तर्फे कृष्णमूर्तींच्या मूळ साहित्याचं मोठ्या प्रमाणात जतनीकरण केलं जातं. चारही फाउंडेशन्स विविध माध्यमातून कृष्णमूर्तींच्या साहित्याचं प्रकाशन करत असतात. ह्या वाहिनीवर कृष्णमूर्तींच्या ध्वनीचित्रफितींना ३० हून अधिक भाषांमधून उपशिर्षकं उपलब्ध आहेत.