तुम्हीच विश्व आहात
₹100.00
आज युवकांमध्ये विलक्षण आणि सखोल असा अस्वस्थपणा आहे. या असंतोषाला प्रतिसाद म्हणून जे. कृष्णमूर्तींचे शब्द प्रत्येक व्यक्तीला स्वत:च स्वत:चा गुरु आणि शिष्य होण्यास सांगत आहेत. आपण जसे प्रत्यक्ष आहोत तसेच स्वत:ला पाहण्यासाठी, त्यांच्या शब्दांचा आरसा म्हणून उपयोग करण्यास ते सांगतात आणि जीवनाच्या समग्र अस्तित्वाचे दर्शन घेण्याचे सुचवितात. अशा प्रकारे दर्शन होण्यासाठी मन संपूर्णपणे मुक्त असले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अधिकाराने–बंधनाने जखडलेले असता कामा नये.
परंतु या मुक्तीचा असा गैरसमज होऊ नये की ही मुक्ती म्हणजे बेशिस्तपणे आणि मनाला येईल तसे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य. ज्या मुक्तीविषयी कृष्णमूर्ती बोलत आहेत त्या मुक्तीसाठी आपल्या मानसिकतेमध्ये संपूर्ण क्रांतीची-परिवर्तनाची आवश्यकता आहे. ज्यावेळी मन स्वत:च स्वत:ला ज्ञातापासून मुक्त करते, तेव्हाच माणसामध्ये संपूर्ण परिवर्तनाची शक्यता असते.
प्रकाशक – केशव भिकाजी ढवळे, पृष्ठे – १६८, भाषांतर – श्री दिवाकर घैसास
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, ओरिया, तेलगू


