आपल्या अस्तित्वाचे स्वरूप

90.00

कृष्णमूर्ती अनेक वर्षे अमेरिकेत भाषणे देत असत. परंतु तेथील राजधानी वॉशिंग्टन येथे त्यांचे भाषण झाले नव्हते. एप्रिल १९८५ मध्ये तेथे बोलण्यास जेव्हा त्यांनी संमती दिली तेव्हा एका दृष्टीने ते एका नव्या श्रोत्रुवर्गाला उद्देशुन बोलणार होते. या दोन संक्षिप्त भाषणांतून त्यांना आपल्या शिकवणीच्या जास्तीत जास्त पैलूंचे सार व्यक्त करायचे होते. दोन्ही दिवशी सभागृह वैविध्यपूर्ण गंभीर श्रोत्यांनी भरलेले होते आणि कृष्णमूर्ती बोलत असताना तेथे एक अनाकलनीय प्रतिसाद होता, एक अशी गुणवत्ता जिथे श्रोते त्यांच्या संवादात सहभागी होते. कृष्णमूर्तींना ते जाणवले आणि त्या दोन दिवसांमध्ये, वयाच्या ९०व्या वर्षी कृष्णमूर्ती त्यांच्या जीवनाच्या आणि शिकवणीच्या परमोच्च शिखरावरून बोलले.

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : १६७, भाषांतर : प्रा. कल्याणी किशोर
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, बंगाली, ओरिया

Also available in