मृत्यूबरोबर जगणे

25.00

आपण मृत्यू नावाच्या त्या असाधारण गोष्टीच्या कधीही संपर्कात येत नाही. मृत्यू म्हणजे भूतकाळातील सर्व गोष्टींना मरणे, तुमच्या सुखद अनुभवांना मरणे. कोणताही वाद न घालता, मनधरणी न करता, बळजबरी न करता, आवश्यकता म्हणून नव्हे, तुम्ही एखाद्या सुखद अनुभवाचा अन्त घडवून आणण्याचा कधी प्रयत्न तरी केला आहे का? तुमचे मरणे अपरिहार्य आहे. परंतु तुमच्या सुखसंवेदना, तुमच्या आठवणी, तुमचे द्वेष, तुमच्या महत्वाकांक्षा, पैसे गोळा करण्याची तुमची तातडी या सर्व गोष्टींना आजच सहजतेने, आनंदाने मृत होण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? तुम्हाला जीवनातून काय हवे असते तर पैसा, मानाचे स्थान, सत्ता आणि दुसर्‍याची ईर्ष्या. या सर्वांना तुम्ही मृत होऊ शकता का? तुम्हाला माहीत असणार्‍या या सर्व गोष्टींना तुम्ही सहजतेने, कोणत्याही सबबीशिवाय, कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय मृत होऊ शकता का?

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : २५, भाषांतर : कल्याणी किशोर
इतर भाषांमधील आवृत्त्या : कन्नड, ओरिया, तामीळ

Also available in