जीवनाची निरंतर वाटचाल हेच शिकणे- शाळांना लिहिलेली पत्रे

300.00

जे. कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना पाठविलेल्या पत्रांचे हे संकलन आहे.
कृष्णमूर्तीं ह्या पत्रांमधून – निव्वळ पदवीलाच महत्व न देता विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास साधून त्यांना मानवी जीवनाची मौलिकता आणि प्रतिष्ठा ह्या गोष्टींची जाणीव करून देणे, केवळ ऐहिक प्रगतीवरच लक्ष केंद्रित न करता त्यापेक्षा महत्वाच्या गोष्टींचा वेध घेण्यासाठी आणि वैश्विक समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना तयार करणे ह्या बाबतीत शिक्षण-पद्धतीला आलेल्या अपयशाकडे आपले लक्ष वेधतात. ही पत्रे वाचताना पालक, शिक्षक, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आणि शिक्षणाविषयी आस्था वाटणाऱ्या अन्य व्यक्तींच्याही जाणीवा समृद्ध होतील.

अगदी पहिल्या पत्रामध्ये कृष्णमूर्ती लिहितात:
मला भारतात असलेल्या शाळा, इंग्लंडमधील ब्रॉकवुड पार्क येथील शाळा, कॅलिफोर्नियातील ओहायमधील ओक ग्रोव्ह शाळा या सर्वांशी संपर्क ठेवावासा वाटतो. म्हणून जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत दर पंधरवड्याला या शाळांना एक पत्र पाठविण्याचा माझा विचार आहे… ह्या पत्रांमधून ह्या शाळा कशा असाव्यात, शैक्षणिकदृष्टा त्या उत्तम असाव्यात पण त्याहूनही काही अधिक असाव्यात हे, ह्या शाळांना जे जबाबदार आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचवू शकेन. एक संपूर्ण व्यक्तिमत्व घडवणे हा त्यांचा ध्यास असला पाहिजे. ह्या शिक्षणकेंद्रांनी विद्यार्थी आणि अध्यापक ह्यांना नैसर्गिकरित्या बहरण्यास मदत केली पाहिजे.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पृष्ठे : २५६, भाषांतर : वासंती पडते

इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी,गुजराथी,