एकमेव परिवर्तन
एकमेव परिवर्तन या पुस्तकात कृष्णमूर्तींची भारत, कॅलिफोर्निया आणि युरोप येथील निरीक्षणे, त्यांच्या त्या त्या प्रसंगांची स्मृतीचित्रे, भेटायला आलेल्या माणसांशी झालेल्या संवादांची सारांशरूप टिपणे आहेत. या पुस्तकात कृष्णमूर्तींची जवळजवळ सर्व शिकवण आली आहे. ध्यान, विचार, मृत्यू, दु:ख, ईश्वर, धर्म, संस्कारबद्धता, लोभ, मत्सर, परस्परसंबंध, नीती अशा अनेक विषयांचे विविध पैलू यात आले आहेत. आपल्या मनात शब्दांचे जे अर्थ परंपरेने आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध असे अर्थ, अभिप्राय कधीकधी कृष्णमूर्ती व्यक्त करतात. त्यामुळे कृष्णमूर्तींच्या मांडणीची कल्पना नसणार्या वाचकाला प्रथम धक्काच बसतो.
प्रकाशक : देशमुख आणि कं., पृष्ठे : १९४, भाषांतर : दिवाकर घैसास, ग. य. दिक्षित, भ. ग. बापट. श्रीकांत ए. बर्वे
इतर भाषांमधील आवृत्त्या : ओरिया, तामीळ, तेलगू
इतर माध्यमातील आवृत्त्या : दृष्टीबादितांसाठी ध्वनिमुद्रित पुस्तकं: मराठी
Product Description


