मानवतेचे भवितव्य

50.00

डेव्हिड बोहम या पदार्थविज्ञान – शास्त्रज्ञांशी जे. कृष्णमूर्तींचे जे खोल शोध घेणारे संवाद झाले त्यांचाच भाग असलेल्या ह्या महत्वाच्या ग्रंथात कृष्णमूर्ती आपल्या सध्याच्या आत्मविनाशकारी प्रचंड सामर्थ्याच्या संदर्भात, आपले हे जगत कितीसे टिकेल याची शक्यता अनावृत्त करीत आहेत.  अंतरंगाचा ठाव पाहणाऱ्या ह्या चर्चांमध्ये कृष्णमूर्ती व बोहम हे, ’काळाचा अर्थ, सामाजिक संस्कारांचा सापळा, व्यक्ती व समाज यांच्यामधील परस्परसंबंध, आणि जाणीवेचे स्वरुप’ अशा चिरंतन समस्यांचे पुन्हा संनिरिक्षण करीत आहेत.  “मानवतेचे भवितव्य काय आहे?”, या प्रश्नापासून प्रारंभ करुन ते असे दाखवितात की जगाच्या समाजरचनेत प्रचंड गोंधळ निर्माण करण्याबद्दल जरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला दोष दिला जात असला तरी मूळ समस्या –“’मानवाच्या विघातक वृत्ती’ – ही ज्ञात काळात प्रथमपासूनच जशी आहे तशीच अस्तित्वात आहे.  व्यक्तींच्याच हाती सर्वनाश वाचवण्याची किल्ली आहे असे ते पुढे प्रतिपादन करतात.

प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, पृष्ठे : २१९, भाषांतर : दिवाकर घैसास