प्रथम अर्थात अतिंम मुक्ति
कृष्णमूर्ती ज्या स्वातंत्र्याबद्दल लिहितात ते मानवाला कमजोर करणाऱ्याला त्याच्या ’स्व’ विषयीच्या अवास्तव तळमळीचा भंग पावणे असते. एकदा का माणसाला हे पहिले स्वातंत्र्य गवसले की तो समाजाच्या अतृप्त आणि विध्वंसक मानसिक व्याप्तीपासून मुक्त होतो. ’प्रथम अर्थात अतिंम मुक्ती’ या पुस्तकात विविध व्यापक विषयांवर चर्चा केली गेली आहे. दु:ख, भीती, निरसता, युध्द, लैंगिकता आणि इतर विषय – पण ती चर्चा सतत स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या गाभ्याकडे परतून येते. इथे कृष्णमूर्तींचे शोध घेणे हे वाचकांचे शोध घेणे बनते.
प्रसिध्द दार्शनिक ऑल्डस हक्सली यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे.
प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, पृष्ठे : ३२३, भाषांतर : दिवाकर घैसास, ग.य.दीक्षित, प्र.ज.देशपांडे
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, ओरिया, पंजाबी, तामीळ, तेलगू, कन्नड


