कालाचा अन्त
₹175.00
विश्वविख्यात तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती आणि आघाडीचे भौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड बोहम यांच्यामधील अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांविषयी उहापोह करणाऱ्या भेदक संवादांचे हे संकलन आहे. या विस्तृत आणि गहन चर्चेचा आरंभबिंदू असलेला प्रश्न म्हणजे, “मानवता आज धोकादायक वळणावर येऊन ठेपली आहे का? आणि त्यामुळेच येथे अविरत संघर्ष, विभाजन आणि विध्वंस दिसून येत आहे का?” कृष्णमूर्ती सुचवतात की आपण प्रत्यक्षात जसे आहोत त्याला सामोरे जाण्याची आपली असमर्थता आणि आपण काय असावे याचे भ्रामक उद्दिष्ट बाळगण्याची आपली गरज यामुळे मानवता अशा घातक वळणावर येऊन ठेपली आहे.
म्हणूनच स्वतःबद्दलच्या आपल्या कल्पना काय असतात हा या संवादांचा गाभा आहे. कृष्णमूर्तींच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या विचारांचे स्वरूप हे आत्मकेंद्री, संदिग्ध आणि पर्यायाने विनाशकारी असते. आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सामान्य धारणांच्या पलीकडे पाहण्याची आंतर्दृष्टी होय. जे मन शांत, विचारांपासून मुक्त आणि प्रत्येक क्षणाचे अवधान ठेवण्यास समर्थ असते त्या मनालाच ती आंतर्दृष्टी प्राप्त होते.
प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : २७८, भाषांतर : गं. भा. गाडगीळ


