शिकवणीचा गाभा

10.00

१९८० साली कृष्णमूर्तीच्या चरित्राचा दुसरा भाग लिहितांना, मेरी लट्येन्स यांना कृष्णजींची शिकवण म्हणजे काय असा प्रश्न पडला. म्हणून त्यांनी एक छोटासा मजकूर लिहिला. त्याची सुरवात त्यांनी, “कृष्णमूर्तीच्या शिकवणीचा क्रांतिकारक गाभा म्हणजे…” अशी केली होती. हा मजकूर नंतर त्यांनी कृष्णजींकडे मंजूरीसाठी पाठवून दिला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे २१ ऑक्टोबर १९८० रोजी कृष्णजीनी त्यातील फक्त गाभा हा शब्द सोडून संपूर्ण मजकूर पुन्हा नव्याने लिहून काढला. हेच हस्तलिखित पुढे ‘शिकवणीचा गाभा’ या नावाने ओळखले जाऊ लागले. सध्या हे हस्तलिखित मूळ इंग्रजीत देखील वाचकांसाठी उपलब्ध नाही. म्हणून ही इंग्रजी – मराठी अशी द्वैभाषिक आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे.

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : ७, भाषांतर : कल्याणी किशोर