जीवन पुस्तक (पुस्तिका)

15.00

१९८० साली श्रीलंकेतील मुक्कामी जे. कृष्णमूर्ती यांनी दिलेले हे दुसरे भाषण अनेक अर्थांनी मूलगामी आहे. ते केवळ अस्तित्ववादाच्या अनेक पैलूंनाच स्पर्श करीत नाही तर सादरीकरणाचा तो एक अभिनव प्रकार आहे. इथे कृष्णमूर्तींनी संपूर्ण जीवनाची अनेक प्रकरणांच्या पुस्तकाशी तुलना केली आहे. जीवनातील संघर्ष, नातेसंबंध, भय, विचार आणि काळ अशा विविध अनुभवांचा विचार करताना ते म्हणतात, ‘जीवनाचा, या पुस्तकाचा अर्थ समजण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नका. ते पुस्तक वाचताना तुम्ही आणि पुस्तक यामध्ये कोणीही तत्वज्ञ, गुरू, पुजारी किंवा देव कुणी कुणीही नाही. तुम्हीच ते पुस्तक आहात आणि तुम्हीच वाचक.’

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाऊंडेशन इंडिया, मुंबई, पृष्ठे : १६, भाषांतर : अजित केळकर
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, कन्नड
इतर माध्यमातील आवृत्त्या : ब्रेल

Also available in