तुम्ही जेथे आहात तेथे ती कृपा आहे

140.00

या पुस्तकात कृष्णमूर्तींनी फेब्रुवारी १९८५ मध्ये मुंबईमध्ये दिलेल्या अखेरच्या चार भाषणांचे संकलन आहे. या भाषणांमधून कृष्णमूर्ती मानसिक बाबी हाताळताना जे बारकावे आणि असामान्य दृष्टीकोन आपल्यासमोर ठेवतात ते लक्षणीय आहेत. आपण स्वत:ला मानसिक दुखापती, संघर्ष, भिती आणि दु:खापासून मुक्त करत नाही आणि आपल्या एखाद्या विशिष्ट विषयावरच्या तज्ञतेच्या जगात राहतो; त्यामुळे आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो, हे स्पष्टपणे पाहण्याची कृष्णमूर्ती शेवटच्या भाषणात आपल्याला कळकळीने विनंती करतात. ह्या भाषणाचा रोख आणि त्यातील मथितार्थ मर्मभेदक आहेत. ते म्हणतात, ‘ही मुक्ती म्हणजे पहिले पाऊल आहे’. भाषणाचा शेवट अतिशय धर्मशील सुरात त्यांच्या गहन अशा निरीक्षणाने होतो: ‘तेव्हा तुम्ही आपले ह्रदय, मन, आणि बुद्धी जर पणाला लावलीत तर असं काही आहे जे पूर्णपणे  कालातीत आहे आणि त्याची कृपा आहे, देवळात नव्हे, चर्चमध्ये नव्हे, मशिदीत नव्हे, तुम्ही जेथे आहात तेथे ती कृपा आहे.’

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : ६९, भाषांतर : कल्याणी किशोर
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी, ओरिया

Also available in