परस्परसंबंध

130.00

जे. कृष्णमूर्ती यांच्या भाषणांमधून आणि लिखाणामधून एकत्रित केलेले ’परस्परसंबंध’ हे विषयानुसार केलेल्या संकलनांपैकी एक संकलन आहे.

इ.स. १९५० मध्ये कृष्णमूर्ती म्हणाले: जर आपल्याला आपल्या जीवनाची चिंता असेल, जर आपल्याला दुसऱ्याबरोबर असलेल्या परस्परसंबंधाचे आकलन झाले तर आपल्याकडून नवसमाजाची निर्मिती होईल. नाहीतर आपण केवळ सध्याची गोंधळग्रस्त आणि संभ्रमित अवस्थाच कायम ठेवू.

जगातील अनेक पेचप्रसंगांची दूरगामी पायाभूत उकल करणारे हे पुस्तक व्यक्तीव्यक्तींमधील, व्यक्ती आणि समाजामधील, व्यक्तीचे स्वत:च्या जीवनाशी असलेल्या परस्परसंबंधांमधील कृष्णमूर्तींची अत्यंत निकडीची असलेली शिकवणूक देते. हे सुप्रसिध्द शिक्षक स्वच्छपणे सांगतात, की ज्या पध्दतीने आपण व्यक्तीगत जीवनातील पेचप्रसंग आणि परस्परसंबंध हाताळतो तेच पुढे सर्व लोकांच्या समस्यांशी जोडले जातात आणि त्याला अधिक व्यापक जगातील अर्थ येतो.

उदाहरणादाखल आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींशी परस्पर आदराच्या प्रत्यक्ष गरजेचे आकलन झाल्याशिवाय युध्दाची कारणे संपवण्याची सुरुवात होऊ शकत नाही.

प्रकाशक : वसुधा प्रकाशन, पृष्ठे :१८९, भाषांतर : शशिकला कर्डिले, श्रीकांत ए. बर्वे

Also available in