ध्यानमग्न मन
₹15.00
Out of stock
ध्यानमग्न मन हा कृष्णमूर्तींच्या ध्यानाविषयीच्या दृष्टीकोनाचा एक चांगला परिचय आहे कारण येथे त्यांची इतर प्रवचने व लिखाणांप्रमाणेच ते आपल्या दैनंदिन जीवनासंबंधी आणि कृतींसंबंधी सजग असण्यावर अव्याहतपणे भर देतात आणि असे निक्षून सांगतात की आपल्या दैनंदिन जीवनात सुव्यवस्था असल्याशिवाय ध्यानाला काहीच अर्थ उरत नाही. विचाराचे नियंत्रण किंवा एखाद्या प्रणालीचा सराव यांसारख्या ध्यानाविषयीच्या पारंपारिक कल्पनांना नाकारत ते म्हणतात, ‘येथे संपूर्ण आत्मबोध असायला हवा; म्हणून येथे कोणतीही प्रणाली, कोणतीही पद्धती, कोणतीही एकाग्रता असून चालणार नाही. जे मन नकाराद्वारे या सगळ्याचे आकलन करून घेते, ते स्वाभाविकच अत्यंत शांत बनते.’
प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, सह्याद्री, पृष्ठे : २३, भाषांतर : कल्याणी किशोर, मंजुषा जाधव
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, मराठी, गुजराथी, ओरिया


