श्रीलंकेतील भाषणे (१९८०)
₹70.00
साऱ्या मानवतेची संपूर्ण कहाणी ही तुमच्यामध्ये सामावलेली आहे. मानवाने युगानुयुगे गोळा केलेले ते अफाट अनुभव, खोलवर रुजलेली सारी भीती, सार्या चिंता, दु:ख, सुखं, सार्या समजुती. तुम्ही ते पुस्तक आहात आणि त्या पुस्तकाचं वाचन करणं ही एक कला आहे. श्रीलंकेमधील या भाषणमालिकेमध्ये कृष्णजींनी हे विधान केले आहे. कुठच्याही प्राचीन पवित्र ग्रंथाचा किंवा आधुनिक तत्वप्रणालींचा अभ्यास करण्यापेक्षा, मानवाने स्वत:चे जीवन-पुस्तक वाचणे, त्यातील वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करणे हे अधिक महत्वाचे आहे, या त्यांच्या मूलभूत अतंर्दृष्टीचा त्यांनी पुनरूच्चार केला आहे.
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन, पृष्ठे : ४८, भाषांतर : दिवाकर घैसास
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी, बंगाली, तेलगू


