भावी जीवन
₹150.00
कृष्णमूर्तींच्या दृष्टिकोनातून शिक्षण ही मानवी जीवनाला अतिशय पूरक – मध्यवर्ती अशी गोष्ट आहे, आणि भावी जीवन (लाईफ अहेड) हे विद्यार्थी ,शिक्षक आणि पालक ह्यांच्याबरोबर त्यांनी साधलेल्या संवादाचे पहिले पुस्तक आहे. ह्या पुस्तकात ज्या गोष्टींचा व्यापकपणे विचार करण्यात आला आहे त्यामध्ये चढाओढीला मिळणारा वाव आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारी भीतीची भावना, त्यामुळे विचलित होणारे मन ; शरीर, मन आणि भावना यांचा समन्वय राखण्यासाठी शरीर सुस्थितीत ठेवण्याची आवश्यकता, एकांतवासाचे महत्त्व; मन संघर्षमुक्त असण्यासाठी मनाच्या सबोध आणि अबोध दोन्ही स्तरांचा बोध होण्याची आवश्यकता, आणि ज्ञान व अभ्यास यामधील सूक्ष्म फरक जाणून घेण्याचे अवधान ह्या विषयांचा समावेश आहे.
कृष्णमूर्तींच्या सार्वजनिक संवादानंतर,मुलांनी उत्स्फूर्तपणे त्यांना विचारलेल्या प्रश्नांचाही अतंर्भाव इथे केला आहे.
प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, पृष्ठे : ३२३, भाषांतर : दिवाकर घैसास, ग. य. दीक्षित, प्र. ज. देशपांडे
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, मलयालम, ओरिया, तेलगू, कन्नड


