दैनंदिनी

150.00

Out of stock

“मी प्रवासात असताना केवळ दैनंदिनीच्या स्वरुपात हे लिखाण केले… परंतु प्रकाशित करण्यासाठी नव्हे. मला स्वत:ला जाणवणारी या जगापासून अलिप्त, संपूर्णपणे संघर्षमुक्त आणि आत्ममग्न असण्याची संवेदना, जिचा उल्लेख मी प्रक्रिया म्हणून करतो, ती इथे वर्णिलेली आहे. हे असे वेळोवेळी होत असते आणि मला स्वच्छपणे जाणवते. पण ते न अनुभवलेल्या व्यक्तींसाठी वर्णन करणे अशक्य असते.”

“तरीसुद्धा एका अतीव संवेदनशील अशा विवेक बुद्धीला जाणवणारी वेदना आणि संवेदना यांना शब्दात पकडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही प्रक्रिया मी काही अद्भूतरम्य पद्धतीने रंगविलेली नाही. जर तुम्ही एक विशिष्ट, शिस्तबद्ध, शांत अशी जीवनप्रणाली अनुसरत असाल तर तुम्ही एका विशिष्ट उर्जेला जन्म देत असता. हे शास्त्रीय सत्य आहे. आणि या उर्जेने तुमच्या मेंदूचा अयांत्रिकी भाग प्रभावित असतो, ज्यामुळे तुम्ही एक आगळ्या परिमाणात प्रवेश करता. शरीर अवयव त्या परिमाणाला भिडण्यास असमर्थ असतात, त्यामुळे वेदना होतात. प्रत्येक व्यक्तीला ही अवस्था प्राप्त करता येईल असे नाही. परंतु ज्या लोकांनी माझे विचार आणि कल्पना पूर्णपणे समजावून घेतली आहे अशांना या वैयक्तिक पातळीवरच्या अनुभवामध्ये रस वाटू शकेल.”

जे. कृष्णमूर्ती (‘द गार्डियन’ ह्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून)

प्रकाशक : नागपूर प्रकाशन, पृष्ठे : ३१०, भाषांतर : सौ विमलाबाई देशपांडे
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी, ओरिया

Also available in