कृष्णमूर्तींचा स्वत:शी संवाद

110.00

गळून पडलेल्या मृत पानाकडे, त्यातील रंग सौंदर्याकडे पाहिले असता, कदाचित शेवटी नव्हे तर प्रारंभीच – आपले मरण कसे असले पाहिजे याचं एखाद्याला सखोल आकलन, भान होऊ शकेल. मृत्यू म्हणजे काही तरी पुढे ढकलण्यासारखी, टाळण्यासारखी, भयंकर गोष्ट नव्हे, तर सतत ज्याच्या बरोबर राहावे अशी गोष्ट आहे. त्यातूनच विशालतेची, अमर्यादाची, अनंताची विलक्षण जाणीव प्राप्त होईल.

या पुस्तकाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव पुस्तक असे आहे की ज्यात कृष्णमूर्तींनी अगदी एकांतात जी स्वगते ध्वनिमुद्रित केली होती त्यांचे शब्दांकन आहे. बहुतेक स्वगते निसर्गवर्णनाने सुरू होतात. या स्वगतांमध्ये वाचक कृष्णमूर्तींच्या  निकट सानिध्यात असतो, कधी कधी असे वाटते की त्यांच्या जाणिवेत डोकावतो. ह्यातील काही स्वगतांमध्ये कृष्णमूर्ती एक काल्पनिक व्यक्ती आणतात, जो त्यांना प्रश्न विचारण्यासाठी येतो.

  1. प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन, पृष्ठे : ११९, भाषांतर : भ. ग. बापट, श्रीकांत ए. बर्वे

Also available in