शिक्षण संवाद

250.00

कृष्णमूर्तींची जीवनदृष्टी अनेक संप्रदायांपेक्षा व धार्मिक समुदायांपेक्षा वेगळी आहे. ती एका अर्थाने खरोखरीच धर्मनिरपेक्ष दृष्टी आहे आणि तरीही तिला एक धर्मशीलतेचा पैलू आहे. रूढ असलेल्या शिक्षक-विद्यार्थी संबंधांपेक्षा, गुरू-शिष्य संबंधांपेक्षा कृष्णमूर्तीची शिकवण वेगळीच वाट चोखाळते.

रूढ दृष्टीकोन मुळातच अधिकाराचा-परंपरेचा आहे. त्यातला शिक्षक ज्ञानी असतो व विद्यार्थी अज्ञानी. शिक्षकाने त्याला शिकवायचे असते. पण कृष्णमूर्तींच्या दृष्टीने शिक्षक व शिष्य एकाच पातळीवर क्रियाशील असतात. ते सतत प्रश्नामागून प्रतिप्रश्न विचारीत असतात. अगदी समस्येच्या तळाशी पोचेपर्यंत – आणि मग त्यातून बोधाचा उदय होतो व दोघांची मने एकदमच प्रकाशित होतात.

या पुस्तकाच्या पहिल्या भागात कृष्णमूर्तींचे विद्यार्थ्यांबरोबरचे संवाद आहेत, तर दुसर्‍या भागात शिक्षकांबरोबरचे संवाद आहेत.

प्रकाशक : साकेत प्रकाशन, पृष्ठे : १८४, भाषांतर : दिवाकर घैसास, ग. य. दिक्षित, चंद्रकांत भोसेकर
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, कन्नड, ओरिया, तामीळ, तेलगू

Also available in