ज्ञातापासून मुक्ती – मोठ्या टाईपमधील आवृत्ती
₹250.00
Out of stock
१९६९ साली झालेल्या प्रथम प्रकाशनापासूनच हे पुस्तक म्हणजे कृष्णमूर्तींच्या शिकवणीचे प्राथमिक पुस्तक मानले गेले आहे. या पुस्तकात मानवी जीवनातील निरंतर समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती या बद्दल कृष्णमूर्तींचे एकत्रित विचार सापडतात. कृष्णमूर्तींनी अमेरिक, युरोप आणि भारतभरातील विविध वयाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांशी सातत्याने संवाद साधला. अशा शेकडो व्याख्यानांमधून या पुस्तकातील मजकुराची निवड केली आहे. कृष्णमूर्तींच्या दीर्घकालीन स्नेही आणि चरित्रकार मेरी लट्येन्स् यांनी हे पुस्तक संकलित करावे अशी इच्छा कृष्णमूर्तींनी प्रकट केली आणि पुस्तकाचे नाव ही त्यांनीच सुचविले. यातील प्रत्येक शब्द कृष्णमूर्तींचाच आहे, पण वाचकांच्या आकलनासाठी पूरक ठरेल अशा पद्धतीने मेरी लट्येन्स् यांनी त्याची एकूण रचना आणि आखणी केली आहे.
ह्या मोठ्या टाइपमधील आवृत्तीमध्ये निव्वळ मोठ्या आकारातील फोटोकॉपी काढण्याऐवजी नेहमीच्या पुस्तकामध्येच मोठ्या टाइपमध्ये मजकुराची मांडणी करण्यात आली आहे. दृष्टिबाधित आणि जेष्ठ नागरिक ह्या दोन्ही वाचकवर्गांना ह्याचा उपयोग होईल.
प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, पृष्ठे : २१९, भाषांतर : दिवाकर घैसास
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, बंगाली, कन्नड, मलयालम, ओरिया, तामीळ, तेलगू, पंजाबी
इतर माध्यमातील आवृत्त्या :
ब्रेल आवृत्त्या: इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी । दृष्टीबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित पुस्तकं: हिंदी, मराठी, गुजराथी


