तेरा संवाद
₹50.00
मालिबू, कॅलिफोर्निया येथे १९६९ मध्ये कृष्णमूर्तींनी श्रोत्यांना सांगितल्याप्रमाणे लिहिल्या गेलेल्या हस्तलिखितामधून हे उतारे घेतले गेले आहेत. जीवनाशी निगडीत असलेल्या महत्वाच्या बाबींचा शोध घेण्याची कृष्णमूर्तींची आगळीच तर्हा या छोट्याश्या संकलनामध्ये आपल्याला पूर्णपणे व्यक्त झालेली दिसून येते, अनेक वर्षे त्यांचे शोध घेणे वेगवेगळ्या स्वरुपात होत गेले. जाहीर भाषणे, पीडीत व्यक्तींशी झालेली खासगी संभाषणे, शास्त्रज्ञ, शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबरच, तसेच मोठया श्रोतृवर्गाबरोबरचे त्यांचे संवाद, आणि पुस्तके, विशेषत: त्यांची दैनंदिनी वजा टिप्पणे – या तेरा संवादांमध्ये या सर्व प्रकारांचे पैलू आहेत आणि तरीही काही वेळेला या संवादांमध्ये दाट जिवलगतेची जाणीव होते, जसे काही कृष्णमूर्ती खुद्द वाचकांशी वैयक्तिक पातळीवर बोलत आहेत.
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन, पृष्ठे : ६४, भाषांतर : दिवाकर घैसास, ग. य. दिक्षित, चंद्रकुमार डांगे
इतर भाषांमधील आवृत्त्या : बंगाली, कन्नड, मलयालम, ओरिया, तेलगू


