शाळा तुम्हाला जीवनासाठी तयार करते का?
₹20.00
आधुनिक शिक्षण पध्दतीत शालेय शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यात कितपत यशस्वी ठरतील याबद्दल कृष्णमूर्तींना खूप काळजी वाटत असे. संपूर्ण जगभर चालणाऱ्या त्यांच्या भाषणांतून आणि चर्चांमधून ते तरुणांना जीवनात येणाऱ्या विविध समस्यांना कशा रीतीने सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन करीत असत – मग ते तरुण कोणत्याही देशातील आणि कोणत्याही व्यवसायातील असोत. ह्या पुस्तकातील विचार तरुणांना आजही तितकेच उद्बोधक आणि ताजे वाटतील जितके वाराणसीत राजघाट बेझंट शाळेतील विद्यार्थ्यांना १९६३ साली प्रत्यक्ष ऎकताना वाटले होते.
प्रकाशक : कृष्णमूर्ती फाऊंडेशन इंडिया, मुंबई, पृष्ठे : १४, भाषांतर : शशिकला कर्डिले
इतर भाषांमधील आवृत्त्या : इंग्रजी


