जीवनभाष्ये खंड – १
₹350.00
Out of stock
ऑल्डस हक्सली यांनी कृष्णमूर्तींना ही जीवनभाष्ये लिहिण्यासाठी उद्द्युक्त केले. ही जीवनभाष्ये म्हणजे कृष्णमूर्तींना जगातील विविध भागात भेटलेल्या सामान्य लोकांशी झालेल्या त्यांच्या संभाषणांची एक मालिका आहे. भारत, युरोप आणि अमेरिका यासारख्या वैविध्यपूर्ण अशा प्रदेशात नोंदल्या गेलेल्या या चर्चा अत्यंत उद्बोधक आहेत. जीवनभाष्ये ही मालिका एका पूर्णपणे वेगळ्या लेखनशैलीची ओळख करुन देते. गाढ धार्मिक जाणिवेतून स्फुरलेलं निसर्गाविषयीचं चिंतन, तात्विक विचार आणि सखोल मानसशास्त्रीय दृष्टीला गवसलेली जीवनसत्ये अतिशय सुस्पष्ट आणि प्रभावी अशा गद्यात इथे व्यक्त होतात.
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन, पृष्ठे : ३५२, भाषांतर : विमलाबाई देशपांडे
इतर भाषांमधील आवृत्त्या : हिंदी, गुजराथी, कन्नड, ओरिया, तेलगू


