हिंसावृत्तीच्या पलिकडे
हिंसेचे स्वरुप एखाद्या तळ्यात टाकलेल्या दगडामुळे उठणाऱ्या तरंगांसारखे असते. त्याचा केंद्रबिंदु हा नेहमी ‘मी’ च असतो. जो पर्यंत कुठल्याही स्वरुपात त्या ‘मी’ चे अस्तित्व आहे तोपर्यंत हिंसा ही असणारच. हिंसा हा विषय आणि त्या विषयीचा कृष्णमूर्तींचा दृष्टीकोन या दोन्ही गोष्टी आजही तितक्याच समर्पक आहेत, जितक्या त्या १९७० साली होत्या. हिंसेविषयी चर्चा करताना कृष्णमूर्ती दु:ख, स्पर्धा, असुरक्षितता, भीती या हिंसेशी निगडीत असलेल्या इतर मानसशास्त्रीय परिणामांचाही अलगद उलगडा करतात. आपल्याला हिंसेकडे बघण्याची एक थेट दृष्टी ते देतात आणि हे करत असताना मानवी मानसिकतेत एका मूलभूत अशा बदलासाठी ते आव्हान करतात. ही मानसिकताच खऱ्या धार्मिक मनाचे द्योतक आहे. या पुस्तकात १९७० साली सॅंटा मोनिका, सॅन डिआगो, लंडन, ब्रॉकवुड पार्क आणि रोम येथे झालेली कृष्णमूर्तींची भाषणे आणि अधिकृत संवाद उद्धृत केले आहेत.
प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, पृष्ठे – १६७, भाषांतर : ग. य. दिक्षित, दिवाकर घैसास, चंद्रकुमार डांगे
इतर भाषांमधील आवृत्त्या: हिंदी, गुजराथी, बंगाली, मलयालम, ओरिया, तामीळ, तेलगू, कन्नड


