पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी

20.00

या पुस्तिकेमध्ये जे. कृष्णमूर्तींनी Life Ahead (भावी जीवन) ह्या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना आहे. ते म्हणतात…
व्यापक व सखोल शिक्षणाच्या बाबतीत पालकांचे औदासिन्य ही शिक्षकाची सर्वात मोठी समस्या असण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारी समाजात प्रतिष्ठित असे एखादे स्थान प्राप्त करण्याची पात्रता देणारे कोणते उथळ ज्ञान आपल्या मुलाला मिळावे एवढीच काळजी बहुतेक पालक करीत असतात. म्हणून केवळ मुलाला योग्य प्रकारे शिक्षण देणे एवढेच काम शिक्षकाला करावयाचे नसून शाळेत जे काही थोडेफार चांगले झाले असेल ते पालकांकडून पुसून टाकले जाणार नाही हेही त्याला पाहावे लागेल. खरोखर घर व शाळा दोन्ही मिळून योग्य शिक्षणाहे एक संयुक्त केंद्र बनले पाहिजे.
ह्या युगातील एक थोर विचारवंत आणि आध्यात्मिक द्रष्टा म्हणून जे. कृषणमूर्ती (१८९५-१९८६) ह्यांची जगभर ख्याती आहे. सर्व मानव समाजाविषयई त्यांना प्रगाढ आस्था होती. सतत सहा दशकांहूनही अधिक काळ जे. कृष्णमूर्तींनी जगभरातील विविध देशांमधील लोकांपुढे भाषणे दिली. गटचर्चा केल्या; कुठल्याही अधिकारवृत्तीने नव्हे, तर एक मित्र, एक सत्यप्रेमी ह्या नात्याने ते आपलं जीवनकार्य करत राहिले. त्यांची शिकवण ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आणि सिद्धांतांवर आधारित नाही; आणि म्हणूनच जगातील सद्यकालीन आणीबाणीच्या परिस्थितीच्या संदर्भातील प्रश्नांची, तसेच मानवी अस्तित्वाशी निगडित चिरंतन प्रश्नांची उत्तरे ज्या व्यक्ती शोधत असतात, त्यांच्याशी कृष्णमूर्ती ह्या जीवनविषयक भाष्यातून थेट संवाद साधतात.

प्रकाशक : कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया – मुंबई केंद्र, पृष्ठे : ३४, भाषांतर : दिवाकर घैसास, ग. य. दिक्षित, चंद्रकांत भोसेकर
इतर भाषांमधील आवृत्त्या : गुजराथी,