NAB (नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लाइंड), मुंबई ह्या संस्थेच्या सहयोगाने दृष्टिबाधित वाचकांसाठी फाउंडेशनच्या काही प्रकाशनांच्या ब्रेल आणि ध्वनिमुद्रित आवृत्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. भारतातील अनेक तत्सम संस्थांना नॅबतर्फे ह्या पुस्तकांचं वितरण करण्यात आलं आहे. ह्या माध्यमांमधून अधिकाधिक पुस्तकांचं प्रकाशन करण्याचा उद्देश आहे.
ही ब्रेल पुस्तकं आपण kfimumbai@gmail.com ला इमेल पाठवून मागवू शकता. ब्रेल प्रेसच्या उपलब्धतेनुसार ह्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. ह्या ब्रेल पुस्तकांची किंमत साधारणपणे रु. ७५/- ते २००/- च्या दरम्यान पृष्ठसंख्येवर अवलंबित असते. ह्या पुस्तकांची जाडी काहीशी जास्त असल्यामुळे ती पाठवण्यासाठी लागणारा भाडेखर्च प्रत्येक ऑर्डरसाठी कळविला जाईल.
नॅबची ही ध्वनिमुद्रित पुस्तकं फक्त दृष्टिबाधित अभ्यासकांसाठी विशिष्ट विनंतीनुसार नॅबद्वारे पुरविली जातात. के. एफ. आय. च्या मुंबई केंद्राशीही आपण ह्यासाठी संपर्क करू शकता.